मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय! (एक प्रेरणादायी आत्मकथनपर निबंध)शिवाजी महाराज निबंध मराठी मधे | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh in Marathi | स्वराज्याचा सुवर्ण इतिहास
प्रस्तावना "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी..." समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचे वर्णन केले, ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर आज प्रत्यक्ष आपल्याशी बोलू लागले तर? हा विचारच मनात रोमांच उभे करतो. रयतेच्या राजाच्या मनातील भावना शब्दांत मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका .
स्वराज्याचा संकल्प आणि माँसाहेबांचे संस्कारमाझा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. माझ्या आयुष्यातील पहिल्या गुरू माझ्या मांसाहेब जिजाबाई होत्या. त्यांनी लहानपणापासून मला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या. त्या काळी प्रजेची होणारी दुर्दशा, मंदिरांची होणारी विटंबना आणि परकीय आक्रमकांचा जुलूम पाहून माझे रक्त सळसळायचे. स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मला माँसाहेबांकडूनच मिळाली. त्यानंतर आबासाहेबांनी दादोजी कोंडदेव यांना माझे गुरु म्हणून पाठवले. त्यांनी मला शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि राजकारणाचे बाळकडू पाजले.
निष्ठवान मावळ्यांची साथवयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मी रोहिडेश्वराच्या मंदिरात सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली. तान्हाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, येसाजी कंक आणि जीवा महाला यांसारख्या जीवाभावाच्या मावळ्यांनी मला साथ दिली. "खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या!"
अशी निष्ठा असणारे माझे सेवक हीच माझी खरी संपत्ती होती. स्वराज्याच्या स्थापनेसाठी या माझ्या हिऱ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, तेव्हाच हा हिंदवी स्वराज्याचा डोलारा उभा राहू शकला.
अहंकाराचा नाश आणि समर्थांचे मार्गदर्शनएकदा सामानगडाचे काम पाहत असताना माझ्या मनात विचार आला की, "मी या हजारो कामगारांचा पोशिंदा आहे." हा अहंकार समर्थ रामदास स्वामींनी ओळखला. त्यांनी एका पाषाणात असलेल्या बेडकाला दाखवून मला जाणीव करून दिली की, या सृष्टीचा चालक तो ईश्वर आहे, मी फक्त एक निमित्त आहे. समर्थांच्या मार्गदर्शनामुळे आणि तुळजा भवानीच्या आशीर्वादामुळेच मी यशाची शिखरे गाठू शकलो.
शत्रूवर मात: बुद्धी आणि शौर्याचा खेळअफझलखान वध: प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफझलखानाचा वध करून आम्ही शत्रूचे कंबरडे मोडले. "शिवाजी" म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर गनिमी काव्याचा विचार आहे हे जगाला दिसले. आग्र्याहून सुटका: औरंगजेबाने दगाफटका करून आम्हाला नजरकैदेत ठेवले, पण बुद्धीचा वापर करून आम्ही पेटाऱ्यातून सुखरूप बाहेर पडलो. शाहिस्तेखानाची फजिती: लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि त्याला पळता भुई थोडी केली.
आजच्या पिढीला संदेशमाझ्या लाडक्या रयतेनो, मी केवळ इतिहास वाचण्यासाठी नाही, तर तो घडवण्यासाठी जन्मलो होतो. स्वराज्य म्हणजे केवळ भूमीचा तुकडा नव्हे, तर ते स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि सत्याचे अधिष्ठान आहे. आज गड-किल्ल्यांचे जतन करा, आया-बहिणींचा आदर करा आणि देशाच्या प्रगतीसाठी एकनिष्ठ राहा. "ही श्रींची इच्छा!" |
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.