www.upkarmarathi.com

     mala Pankh aste tar Marathi nibandh, प्रिय मित्रांनो आज आपण आपल्या हक्काच्या मराठी ब्लॉग वर मला पंख असते तर , मराठी निबंध बघूया.

|marathi nibandh|

   मला पंख असते तर... मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

प्रस्तावना:

निसर्ग अनेक सुंदर गोष्टींनी नटलेला आहे. त्यातील एक अत्यंत सुंदर बाब म्हणजे पक्षी. आकाशात पक्षी जेव्हा मुक्तपणे उडू लागतात, तेव्हा ते दृश्य फारच मनमोहक दिसते. त्या सुंदर पक्षांना बघून माझ्या मनात एक दिवस विचार आला की, जर खरोखरच 'मला पंख असते तर?' या विचारानेच मी एका कल्पनेच्या दुनियेत हरवून गेलो. चला तर मग, या सुंदर विषयावर आधारित निबंध पाहूया.

mala-pankh-aste-tar-marathi-nibandh


मुक्त संचार आणि मजा:

मला पंख असते तर फारच मजा आली असती. हवे तिथे आणि हवे तेव्हा मला जाता आले असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या गाडीचा पेट्रोलचा खर्च वाचला असता. पप्पा मला दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जातात, त्यात खूप पेट्रोल खर्च होते; पण मला पंख असते तर मी स्वतःच उडत फिरायला गेलो असतो. यामुळे आमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचले असते.

शाळेतील धमाल:

शाळेत जाण्यासाठी मला खूपच कमी वेळ लागला असता. ट्रॅफिकची कटकट उरली नसती. कधी मी घरात एखादी वस्तू किंवा वही विसरलो, तर शाळेतून पटकन घरी उडून जाऊन ती वस्तू घेऊन पुन्हा वर्गात हजर झालो असतो. जर कधी माझा अभ्यास अपूर्ण राहिला आणि शिक्षिका शिक्षा देण्यासाठी जवळ आल्या, तर मी लगेच खिडकीतून भुरकन उडून गेलो असतो आणि त्यांचा तास संपल्यावरच परत आलो असतो.

देश-विदेशाची सफर:

आपल्याकडे जसे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये परदेशी पक्षी पाहुणे म्हणून येतात, तसेच मी सुद्धा त्यांच्या देशांत पाहुणा बनून गेलो असतो. तिथल्या नद्या, डोंगर आणि तिथली माणसे कशी आहेत, हे मी डोळे भरून पाहिले असते. तिथल्या गोष्टी मी माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि पालकांना येऊन सांगितल्या असत्या. विमान प्रवासाच्या खर्चाशिवाय संपूर्ण जग फिरण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले असते.

आकाशातील उंच भरारी:

मला पंख आले तर मी आकाशात उंच भरारी घेईन. ढगांच्याही वर जाऊन निरभ्र आकाशातून सूर्याचे दर्शन घेईन. रात्रीच्या वेळी चांदोमामाला अगदी जवळून बघायला मी विसरणार नाही. मी गरुडासारखी उंच झेप घेईन आणि तिथून वेगाने माझ्या मित्रांकडे येईन. त्यांनाही माझ्या पाठीवर बसवून आकाशाची सफर घडवून आणिन, ज्यामुळे आमची मैत्री अजूनच घट्ट होईल.

निष्कर्ष:

दिवसभर उडून थकल्यानंतर रात्री झोपायला मात्र मी माझ्या घरीच येईन. झोपताना सुरुवातीला पंखांमुळे थोडी अडचण होईल, पण म्हणतात ना "कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है!" पंख असणे ही एक कल्पना असली, तरी ती मला खूप आनंद देऊन जाते.


मित्रांनो, हा निबंध तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!


या निबंधाचे खालीलप्रमाणेही नावे असू शकतात.

१) |मला उडता आले तर
२) |मला उडण्याची शक्ती मिळाली तर
३) |मी उडु शकली तर 
४) |mala udata aale tar

खालील निबंध वाचायला विसरू नका.

  1. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  2. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. परीक्षा .. छान मराठी लेख.
  5. उपकार ...छान कथा वाचा.
  6. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  7.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  8. रम्य पहाट
  9. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  10. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  11. सुंदर विचार
  12. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने